Help

स्वागत आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि


logoनाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि संपूर्ण नासिक जिल्हयाची अर्थवाहिनी म्हणून काम करते आहे. बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा संस्थांमार्फत शेतकरी सभासदांपर्यंत कर्जपुरवठा व सवलती पुरवून प्रत्येक सभासदाचे जीवनमान उंचावण्याचे काम केले जाते आहे. नासिक जिल्हयाची भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास असा एकमेव जिल्हा आहे की ज्यात सर्व प्रकारची पिके घेतली जातात व प्रत्येक तालुक्यात वेगवेगळया जातीधर्माचे बांधव असल्याने प्रत्येकाच्या संस्कृतीचा आदर येथे केला जातो. बँक सामाजीक बांधीलकी जपत स्थापनेपासून विविध शाखामार्फत सभासद , शेतकरी व ग्राहकांची सेवा विनम्रपणे देत आहे तसेच विविध सामाजीक,शैक्षणिक व इतर क्षेत्रातही पुरेपुर सहभाग घेतलेला आहे.

नाशिक जिल्हयातील सहकार धुरीनांनी सहकार क्षेत्रात दिलेले योगदान हे विस्मरणीय असून विविध सहकारी संस्थांनी आज जी काही प्रगती केलेली आहे ती नक्कीच इतीहासात नोंदण्याजोगी आहे. बॅकेच्या सुमारे 212 शाखेमार्फत कोअर बँकींग प्रणाली कार्यान्वीत केलेली असून बँकेने IFSC क्रमांकही घेतलेला आहे, ज्यामुळे खातेदारांना भारतातून कोणत्याही बँकेकडून RTGS / NEFT द्वारे पैसे तात्काळ खात्यावर जमा करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. बॅकेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांचे पगार त्यांचे सेवकांना अदा केले जातात त्यांचेसाठीही रु. 2,00,000/- पर्यतचे कॅश क्रेडीट सुविधाही बँकेने सुरु केलेली आहे. या व अशा अनेक प्रकारच्या ग्राहक हिताच्या योजना व अदयावत तंत्रज्ञानाचा वापर बँक भविष्यात करणार आहे.

शेतकरी सभासदांना नाबार्ड, राज्यबँक व शासनाच्या विविध कर्ज व व्याज सवलत योजना लागू असून त्यासाठी सभासदांनी वेळेत बँकेच्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. थकबाकी वाढल्यास सभासदास कोणत्याही सवलती प्राप्त होत नाहीत म्हणूनच प्रत्येक सभासदाने आपली पत टिकविणेसाठी थकबाकीदार होणार नाही असा निश्चय करावा जेणेकरुन बँक यशोशिखरावर पोहचविण्यास आपलाही हातभार लागेत व आपणही या संस्थेच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नोदविल्याचा आनंद आपणास होईल.


बँक प्रोफाइल

बँकेचे नाव:नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. , नाशिक
पत्ता:मुंबई-आग्रा महामार्ग, द्वारका सर्कल जवळ, नाशिक-११
तार :कृषिबँक, नाशिक
ई-मेल:nasikdcc@hotmail.com,info@nasikdcc.com
दुरध्वनी क्रमांक:(०२५३)२५०४३८१,२५०४३८३,२५०४३८४,२५९४३८२,२५९९३७३,२५९५६३७,२५०११९१
फॅक्स नं. :(०२५३)२५९५५२५
पत्रपेटी नं. :१२०६(नाशिक ४२२ ०११)
नोंदणी क्र. :२०२९४
लायसन्स क्र. :ग्रा. आ. ऋ. वि. मु. से. का. १२५४/१८.०१.०३८/२०११-१२
आय.एफ.एस.सी. कोड:ICIC00NDCCB
एकूण शाखा:२१३