Help

ठेव योजना


खालील प्रमाणे ग्राहक म्हणुन मान्यताप्राप्त व्यक्ती / संस्था बँकेकडे कोणत्याही प्रकारचे (बचत / चालु / ठेव /कर्ज )खाते उघडु शकतात.

व्यक्तीगत

 • व्यक्ती वय वर्ष अठरा पुर्ण अर्थात कायद्याने सज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती बँकेची ग्राहक होउ शकते.
  वय वर्ष अठरा पुर्ण नसलेल्या अर्थात कायद्याने अज्ञान व्यक्तीस बँकेचा ग्राहक होणे असल्यास अज्ञान व्यक्तीचा जन्म तारखेचा दाखला देणे आवश्यक आहे. अशा ग्राहकाच्या खात्यावरील व्यवहार त्याच्या नैसर्गिक पालनकर्त्यास किंवा कायदेशीर दस्तऐवजाने किंवा कोर्टाने नेमुन दिलेल्या पालनकर्त्यास करता येईल.
  स्थानिक स्वराज्या संस्था, शैक्षणीक संस्था, धर्मदाय संस्था, धार्मिक संस्था, बचत गट, पार्टनरशिप, प्रोप्रायटर, कंपनी विविध फर्म इ. प्रकारच्या कायदेशीर रित्या प्रस्थापीत संस्था ह्या बँकेच्या ग्राहक होउ शकतात.
 • नियोजित सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक सहकारी संस्था महाराष्ट्र सहकार कायदा १९६० अन्वये मान्यताप्राप्त सहकारी संस्था (नागरी सहकारी बँका वगळुन).
 • नागरी बँका महाराष्ट्र सहकार कायदा १९६० अन्वये मान्यताप्राप्त नागरी सहकारी बँका.
 • नियोजित सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक
 • स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परीषद, महानगर पालिका, नगर पालिका, ग्रामपंचायत, इ.
 • पार्टनरशिप, प्रोप्रायटर कंपनी, विविध फर्म इ.
 • शैक्षणीक संस्था, धर्मदाय संस्था, धार्मिक संस्था
 • बचत गट

सामान्य ग्राहक, सहकारी संस्था, अर्बन बँका लाभप्रदतेच्या दृष्टीने बचत ठेव खात्यांवर ४.50% व्याजदर


खाते प्रकारबचत खातेचालु खाते
खाते उघडतांना किमान रक्कम५००/-१०००/-
चेकबुक सुविधा हवी असल्यास खात्यावर किमान बाकी१०००/-५०००/-